Thursday 5 September 2013

थेट लाभ वितरण योजनेचा केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते शुभारंभ



नंदुरबार दिल्लीच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या (CPSMS) सेन्ट्रल प्लॅन स्किम मॉनिटरींग सिस्टीम या प्रणालीच्या सहाय्याने नंदुरबार जिल्ह्यातील 4 हजार 330 लाभार्थ्यांची यादी सेंट्रल सर्व्हेरला पाठविण्यात आली असून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते 1 हजार 373 लाभार्थ्यांच्या बँकेतील खात्यात या प्रणालीद्वारे पैसे वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरिया, सहाय्यक जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, रोहयो उपजिल्हाधिकारी, कुंदन सोनवणे, तांत्रिक संचालक संजय कोतकर, संजय गांधी निराधार योजनेचे तहसिलदार टी. बी. भोई, एनआयसीचे अभियंता अमीर पटेल, घुगे, श्री. सुर्यवंशी, श्री. संदानशिव, व श्री. चौधरी आदी उपस्थित होते.

केंद्र शासनामार्फत जनतेच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यासाठी डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर (DBT) हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्ह्यासह 12 जिल्ह्यांमध्ये डीबीटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. डीबीटी प्रकल्पातंर्गत राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमात समावेश होणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना या योजनातंर्गत लाभार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांमध्ये त्यांच्या निवृत्ती वेतनाची रक्कम दिनांक 1 जुलै 2013 पासून दरमहा अदा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या प्रणालीच्या सहाय्याने सर्व तहसिलदारांच्या डिजिटल सिग्नेचरची नोंद करण्यात आली असून या डिजिटल सिग्नेचराच्या सहाय्याने ई-प्रणालीव्दारे लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य तहसिलदारांनी मंजूर केले आहे. या प्रणालीच्या यशस्वितेसाठी राज्य सूचना व विज्ञान अधिकारी तथा उपमहानिदेशक मोईज हुसेन, मुंबई एनआयसीचे वरिष्ठ तांत्रिक संचालक मेघा दळवी, तांत्रिक संचालक संजय कोतकर, एनआयसीचे अभियंते अमीर पटेल, तहसिलदार टी. बी. भोई यांनी विशेष परिश्रम घेतले

किओस्क प्रणालीचे उद्घाटन डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते संपन्न


नंदुरबार : 7/12 वरील फेरफार नोंदींची माहिती पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या किओस्क प्रणालीचे (टच स्क्रीन) उद्घाटन मंत्री वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन डॉ. विजयकुमार गावीत, यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावीत उपस्थित होते.

सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत नागरिकांना 7/12 वरील फेरफार नोंदींची माहिती पाहण्यासाठी ही प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रायोगिक तत्वावर नंदुरबार शहाराच्या अंदाजे 25000 फेरफार नोंदी डिजिटाईज (स्कॅन) करुन संगणकात घेण्यात आलेल्या असून त्यासाठी लागणारी संगणक प्रणाली एनआयसी नंदुरबार येथे विकसित केली असून सर्व फेरफार हे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र येथे डिजिटाईज करण्यात आलेल्या आहेत.

या प्रणालीमुळे नागरिकांना त्यांची फेरफार नोंद पाहण्यासाठी अभिलेख कक्षामध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नसून सर्व नोंदी ह्या किओस्क प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ व श्रम वाचणार असून त्यांना या नोंदी तात्काळ उपलब्ध होतील. याशिवाय मूळ अभिलेख पुन्हा पुन्हा हाताळतांना होणारे नुकसान टाळले जाणार आहे.

या संगणक प्रणालीमुळे विकसीत करण्यासाठी जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरिया, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी तथा उपमहानिदेशक एनआयसी मुंबई मोईज हुसेन, अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, प्रकाश थविल यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रणाली विकसित करण्यासाठी तांत्रिक संचालक संजय कोतकर, नंदुरबार तहसिलदार महेश शेलार, एनआयसीचे अभियंते अंबालाल मगर यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.


http://mahanews.gov.in/Home/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=YUOoHIBPq7g%3D

welcome to nic nandurbar